क्राईम न्यूज

Bhayandar Chain Snacher News : भाईंदरमध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचणारा चोरटा 12 तासांत जेरबंद; नवघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Navghar Police Latest News : भरवस्तीतील चोरीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; 23 सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपीला बेड्या

भाईंदर | भाईंदर पूर्व येथील तलाव रोड परिसरात एका 60 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी Chain Snacher खेचून पळणाऱ्या चोरट्याला नवघर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली आहे. सोशल मीडियावर या धाडसी चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपीला गजाआड केले आहे. Navghar Police News

नेमकी घटना काय?

सिध्दीविनायक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कोकीला कुंजबिहारी पांडे (60 वय) या 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर जात होत्या. त्याच वेळी 20 ते 25 वयोगटातील एका तरुणाने त्यांच्या पाठीमागून येऊन गळ्यातील सोन्याची चैन जबरीने खेचली. झटापटीत चैन तुटून खाली पडली आणि पांडे यांनी आरडाओरडा केल्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने चोरटा तिथून पळून गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

पोलिसांचा ‘स्मार्ट’ तपास

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील तब्बल 23 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक परीक्षणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. इरफान हबीब मन्सुरी (वय 20) याने हा गुन्हा केल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून त्याला 12 तासांच्या आत ताब्यात घेतले आणि अटक केली.

यांनी केली कामगिरी

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप आयुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दुमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. वृद्ध महिलेवर झालेल्या या हल्ल्यातील आरोपीला तत्काळ पकडल्याबद्दल भाईंदरकरांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago