Mumbai Police Latest News
Navghar Crime Branch Arrested Chain Snacher : खुन आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; 2 लाखांची सोन्याची चेन हस्तगत
भाईंदर | भाईंदर पूर्व येथील नवघर परिसरात Navghar Police एका 64 वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने खेचून पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नवघर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेली 2 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हस्तगत केली आहे. Bhayandar Police Latest News
भररस्त्यात जेष्ठ महिलेला लक्ष्य
7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळीच्या सुमारास फिर्यादी रिना बाबुल गोम्स या नवघर गावातील बादशाहा मैदानाजवळून पायी जात होत्या. यावेळी एका अनोळखी इसमाने पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून नवघर पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता 2023’ च्या कलम 309 (4) अन्वये गुन्हा दाखल करून तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
सराईत गुन्हेगार जाळ्यात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे राम छबुराव पंडित (40 वय) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी राम पंडित हा साधा चोर नसून त्याच्यावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात खुनाचा (कलम 302), तर भाईंदर, मिरारोड आणि नवघर पोलीस ठाण्यात चोरी व गंभीर दुखापतीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. Bhayandar Police Latest News
यशस्वी तपास पथक
ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त राहुल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…