Bhayandar Car Robbery News : मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिटला यश, आरोपीला बिहार राज्यातून अटक
भाईंदर :- लग्झरी कारची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण युनिटच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी दिली आहे. Bhayandar Car Robbery News या आरोपीकडून पाच गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेली कार हस्तगत करण्यात आल्या आहे.
पोलिसांनी दिलेलं माहितीनुसार, 5 मार्च ते 6 मार्चच्या दरम्यान मनिषा शांतीलाल जैन,( वय 45 रा.विशाल अपार्टमेन्ट भाईंदर प.) यांनी त्यांचे कडे असलेली 15 लाखा किंमतीची महिंद्रा कंपनीची थार कार हि इमारतीचे पार्किंग मध्ये पार्क करुन ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्यादी यांनी भाईंदर पोलीस ठाणे Bhayandar Police Station केली होती पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बी.एन.एस. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशान्वये गुन्ह्याचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरून अभिषेक अरविंद सिंग, (वय-25, रा. जि. बक्सर, राज्य-बिहार) याला अटक केली आहे.गुन्ह्यातील चोरी केलेली 15 लाख रुपये किंमतीची महिंद्रा थार कार ताब्यात घेण्यात आली आहे.5 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपीवर यापूर्वीही आरोपीने टोयाटो फाच्यूनर,होंन्डा ॲमेझ,होंन्डा सिटी,टोयाटो यारीस असे एकूण 59 लाखांच्या कारची चोरी केल्याची पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्या असून आरोपीला अटक करून भाईंदर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे, प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविंद केंद्रे, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, विकास राजपुत, संदिप शेरमाळे, रविंद्र कांबळे, पोलीस अंमलदार नितीन राठोड, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण,सचिन चौधरी यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…