Bhayandar Police Latest News : घरमालकासह जुगार चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल; पोलिसांनी दाखवली धडाकेबाज कामगिरी.
भाईंदर :- शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर भाईंदर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भाईंदर पश्चिम येथील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 20 जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 31 हजार 359 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, जुगार खेळणाऱ्या आणि तो चालवणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bhayandar Latest Crime News
पोलिस उपायुक्त, परिमंडळ-1, राहुल चव्हाण यांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भाईंदर पश्चिममधील शांतीदर्शन बिल्डिंगमधील रुम नंबर 201 मध्ये काही लोक बेकायदेशीरपणे ‘तीन पत्ती’ जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी भाईंदर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंता गायकवाड यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी आपल्या पथकासह, दोन पंचांच्या उपस्थितीत सोमवार, 4 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी बंद खोलीत संदीपकुमार केडिया (वय 55), जितेंद्र पुनमीया (वय 51), मनिषकुमार पारीख (वय 36) यांच्यासह एकूण 20 व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या सर्व आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी केवळ जुगार खेळणाऱ्यांवरच नव्हे, तर ज्या घरात हा जुगार सुरू होता त्या घरमालक मंदादेवी जोशी आणि जुगाराचा अड्डा चालवणारा विष्णू (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 च्या कलम 4 व 5 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, भाईंदर पोलिसांनी केलेली ही कारवाई अवैध धंद्यांवर कठोर नियंत्रण आणण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…