मुंबई

Bhaskar Jadhav : राजकीय वादळाची चाहूल? भास्कर जाधव यांच्या मनात नवा प्रवास?

Sanjay Raut On Bhaskar Jadhav : संजय राऊतांवर थेट शब्दबाण; ‘हुजूरीची सवय नाही’ म्हणत टीका!

मुंबई :- शिवसेनेच्या (ठाकरे गट) कोकणातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार भास्कर जाधव Bhaskar Jadhav सध्या एका वेगळ्याच मनःस्थितीत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी “राजकारणातून निवृत्ती घ्यावीशी वाटते” असं म्हटलं आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चा पेटली.

याचदरम्यान, खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. “भाषण करायला मिळालंच पाहिजे, अशी हवा माझ्या डोक्यात कधीच गेली नाही. जी हुजूरी करायला मी कुठेच गेलो नाही,” असा स्पष्ट टोला त्यांनी राऊतांना लगावला. त्यांचं हे वक्तव्य ठाकरे गटातील अंतर्गत वादाला अधोरेखित करतं का, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

उदय सामंतांचा सल्ला – “शिंदेंचं नेतृत्व स्वीकारा, कोकणाला दिशा मिळेल”

दरम्यान, भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण देत “माझ्या नाराजीच्या चर्चा अर्थहीन आहेत,” असं म्हणत वाद थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संजय राऊतांनीही आपली भूमिका स्पष्ट करत “भास्कर जाधव हे आमचे जवळचे सहकारी आहेत. ते उद्धव ठाकरेंशी मुंबईत भेटतील आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या जातील,” असं सांगितलं आहे.

राजकीय पटलावर सध्या निर्माण झालेलं हे वलय केवळ चर्चेपुरतं मर्यादित राहणार, की कोकणात खरोखरच एक नवीन समीकरण उभं राहणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

vivek

Recent Posts