मुंबई
Trending

Bharti Kamdi Palghar : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का!

Bharti Kamdi Palghar News : पालघर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. भारती कामडी याचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र!

मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांना इन्कमिंग आणि आउटगोइंग चा फटका बसत आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटात एक नेते मंडळीची इन्कमिंग झाली आहे.शिवसेना (ठाकरे) Thackeray Group पक्षाला पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार राहिलेल्या भारती कामडी Bharti Kamdi Palghar Sabha यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. कामडी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हाती धरला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे.

भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत चार लाख 17 हजार मतं मिळाली होती. मात्र भाजपचे हेमंत सावरा 6 लाखांहून अधिक मतं मिळवत विजयी झाले होते. पराभवाचा झटका बसल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला. पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.

कोण आहेत भारती कामडी?

पालघर जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक 2014-15 मध्ये पार पडली, त्यावेळी भारती कामडींनी वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडा गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. 2020 साली विक्रमगड तालुक्यातील तलवाडा गटातून त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांना 2020-21 या काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले होते. त्या पालघर तालुक्यातील असून वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0