Bhandhup Fire News भांडुपमध्ये पहाटेचा थरार! एका रात्रीत पाच दुचाकी जळून खाक
Bhandhup Latest Fire News : अज्ञात व्यक्तींकडून दुचाकींना आग; पोलीसांकडून आरोपीचा शोध
मुंबई | भांडुप – भांडुपच्या खिंडीपाडा भागात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेली एक धक्कादायक घटना स्थानिकांमध्ये खळबळ माजवून गेली. गडवाडी चाळ परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच दुचाकींना अज्ञात व्यक्तींनी आगीच्या भक्षस्थानी दिले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. Bhandhup Latest Fire News
तक्रारदार सलीम खान यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी रविवारी रात्री चाळीसमोर रस्त्यावर उभी केली होती. मात्र सोमवारी पहाटे त्यांच्या दोन दुचाकीसह परिसरातील आणखी तीन दुचाकींना अचानक आग लागली. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कोणी तरी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात Bhandhup Police News अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा माग काढत आहेत. घटनास्थळी भेट देत पोलीस सखोल तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.


