क्रीडा
Trending

England Vs India 4th Test Match : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीला मँचेस्टरमध्ये प्रारंभ; नाणेफेक गमावत भारताची प्रथम फलंदाजी

England Vs India 4th Test Match : खेळाडूंच्या दुखापतींचा भारताला फटका, संघात 3 मोठे बदल; युवा अंशुल कंबोजचे पदार्पण

Ind vs Eng 4th test :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आजपासून (23 जुलै) मँचेस्टर येथे सुरू झाला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने सलग चौथ्यांदा नाणेफेक जिंकण्याचा विक्रम केला असून, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

भारताला दुखापतींचा फटका, संघात मोठे बदल

चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. करुण नायरला वगळून युवा साई सुदर्शनला संघात संधी मिळाली आहे. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये नायर प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता. नितीश रेड्डीच्या जागी to अनुभवी शार्दुल ठाकूर संघात परतला आहे, तर आकाशदीपच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

मँचेस्टर कसोटीत भारताच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली असून, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी मैदानावर आहे. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला बाद होण्यापासून जीवदान मिळाले, मात्र त्याने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत भारताला दमदार सुरुवात करून दिली.

भारताची प्लेईंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज.

इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0