क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Belapur Fraud Call Center : बेलापूरच्या कॉल सेंटरवर फसवणुकीचे आरोप!

Navi Mumbai Belapur Latest Crime News : अमी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे शोषण?

नवी मुंबई : बेलापूरमधील ‘अमी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड’ Belapur Amii Pvt LTD या कॉल सेंटरवर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणे, फसवणूक, आणि नाव बदलून क्लायंटची दिशाभूल करणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. Fake Call Center या प्रकरणामुळे आयटी व कॉल सेंटर क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. Navi Mumbai Latest Crime News

बेलापूर स्टेशन टॉवर क्र. 4 च्या सहाव्या मजल्यावर कार्यरत असलेल्या या कंपनीविरोधात युवा ग्रामीण पत्रकार संघ, पनवेल तालुका अध्यक्षांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे पगार विनाकारण रोखले जातात आणि किरकोळ कारणांवरून त्यांना पगार नाकारला जातो. यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

नाव बदलून क्लायंटची दिशाभूल, पगार थकवण्याची तक्रार; चौकशीची मागणी

तसेच, क्लायंट भेटीच्या वेळी कंपनीकडून रातोरात नाव बदलण्याचा प्रकार करण्यात येतो, एजंट्सना त्यांच्या मूळ ओळखीचे आयडी वापरण्यास मनाई केली जाते, अशी माहितीही समोर आली आहे. हा प्रकार घोटाळ्याचा भाग असून, ग्राहकांची दिशाभूल केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

तक्रारकर्त्यांनी संबंधित प्राधिकरणांकडे तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. कॉल सेंटर क्षेत्रातील विश्वास आणि पारदर्शकतेला धक्का लागणाऱ्या या प्रकाराची चौकशी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही तक्रारकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0