देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गोपीनाथ मुंडे आणि बजरंग सोनवणे समर्थकांकडून जयघोष
बीड :- अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीडच्या रेल्वे सेवेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ऐतिहासिक क्षणी भावना व्यक्त करताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होत असतानाच्या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत.”
या सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. “पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी विशेष तरतुदी केल्या. ज्यांनी ज्यांनी या रेल्वेमार्गासाठी संघर्ष केला, त्या सर्वांचेही मनापासून आभार,” असे त्या म्हणाल्या.
राजकीय घोषणाबाजीने वेधले लक्ष
आज झालेल्या या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वे बीडहून अहिल्यानगरकडे रवाना झाली. याच दरम्यान, रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचे फोटो दाखवत ‘मुंडे साहेब अमर रहे’च्या घोषणा दिल्या, तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी ‘दबंग खासदार’ असे फलक झळकवत जयघोष केला.
अहमदनगर-बीड-परळी मार्गाचा महत्त्वाकांक्षी टप्पा
अहमदनगर-बीड-परळी या 261.25 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. रेल्वे अर्थसंकल्पात यासाठी २७५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली होती. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आणि नागरिकांच्या प्रयत्नानंतर बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…