क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

Beed Police News : बीड पोलीस ठाण्यातच ‘खंडणी’! – सराफ व्यापाऱ्यास धमकी देऊन 4 लाख लुटले; ‘शिवाजीनगर’ पोलीस उपनिरीक्षकासह इतरांविरोधात तक्रार!

Beed Police Bribe News : मुंबईच्या व्यापाऱ्यास लॉजवर डांबून 7 लाखांची मागणी; पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले

बीड :- सातत्याने गुन्हेगारी कारवायांसाठी चर्चेत असलेले बीड शहर Beed City आता थेट पोलिसांच्या कृत्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस Beed Shivaji Nagar Police Station ठाण्यातील काही पोलिसांनी मुंबईतील एका सराफ व्यापाऱ्यास धमकी देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये खंडणी घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. Beed Police Latest Crime News

नेमकी घटना काय?

मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे 24 नोव्हेंबर रोजी बीड शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. त्याच वेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या खोलीत अचानक दाखल झाले.

पोलिसांनी मयंक जैन यांच्याकडील सोन्याच्या मालासह मोबाईल ताब्यात घेऊन तो स्वीच ऑफ केला. त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकत सात लाख रुपयांची मागणी केली.मयंक जैन यांना मेडिकलचे कारण सांगून बीडमधीलच दुसऱ्या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये रोख रक्कम मागवण्यास सांगण्यात आले. ती चार लाखांची रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी स्वीकारली आणि उर्वरित तीन लाख रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी देण्यास सांगितले.

रात्रभर डांबून ठेवले

पैसे घेतल्यानंतरही पोलिसांनी मयंक जैन यांना दुसऱ्या एका लॉजवर रात्रभर डांबून ठेवले आणि त्यानंतर सकाळी त्यांची सुटका केली. सुटका झाल्यानंतर मयंक जैन यांनी घडलेली आपबिती त्यांच्या व्यापारी मित्रांना सांगितली.

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सराफा व्यापाऱ्याने आता पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. सराफा असोसिएशनने आरोपी पोलिसांना पाठीशी न घालता त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.या गंभीर तक्रारीनंतर, अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0