•रघुनाथ फड टोळीतील पाच आरोपींवरील मकोका रद्द, गोट्या गित्तेच्यावरील कारवाईही मागे
बीड :- बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईत आता एक नवा ट्विस्ट आला आहे. परळी तालुक्यातील सहदेव सातभाई यांच्यावरील खुनाच्या प्रयत्नानंतर ज्या टोळ्यांवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, त्यातील एका प्रमुख टोळीतील पाच आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आला आहे. यामुळे जिल्हाभर मोठी खळबळ उडाली आहे.
बीड पोलिसांनी वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक असलेल्या रघुनाथ फड याच्या टोळीवर ‘मकोका’ लावला होता. वाल्मिक कराडचा ‘राईट हँड’ म्हणून ओळख असलेला आणि मागील काही महिन्यांपासून फरार असलेला गोट्या गित्ते याच्यावरही याच कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता पोलिसांनी मोठा निर्णय घेत या सात आरोपींपैकी पाच जणांवरील मकोका रद्द केला आहे.
गोट्या गित्तेवरची कारवाई मागे
मकोका रद्द करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोट्या गित्ते, संदीप सोनवणे, जगन्नाथ फड, विलास गित्ते आणि बालाजी गित्ते यांचा समावेश आहे. यामुळे गोट्या गित्ते आणि इतर पाच आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. रघुनाथ फड टोळीवर सहदेव सातभाई यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा आरोप होता. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच फरार असलेला गोट्या गित्ते याने रेल्वे पटरीवर बसून एक व्हिडीओ तयार केला होता. त्यात त्याने म्हटले होते की, “आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाल्मिक कराडवर खोटे आरोप केले जात आहेत.” त्याने राज्याचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही आरोप करत, “माझ्या जीवाला काही झाले, तर त्याला जितेंद्र आव्हाड जबाबदार असतील” असे म्हटले होते.
पोलिस मागील काही दिवसांपासून गोट्या गित्तेच्या शोधात होते, मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. तो सोशल मीडियावर सतत व्हिडिओ शेअर करताना दिसत होता. पोलिसांना काही प्रकरणांमध्ये त्याची चौकशी करायची होती. आता त्याच्यावरील मकोकाची कारवाईही रद्द करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या टोळीतील इतर दोन आरोपींवरील मकोका मात्र अद्याप रद्द करण्यात आलेला नाही.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…