•परभणी आणि बीडमधील वाद भोवला; नैराश्यातून जीवन संपवल्याचा संशय
बीड – पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे Sunil Nagargoje यांनी बीडमधील अंबाजोगाई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागरगोजे नैराश्यात होते, अशी माहिती समोर आली आहे.
नेमका प्रकार काय घडला?
मूळचे परळी तालुक्यातील नागदरा येथील असलेले सुनील नागरगोजे Sunil Nagargoje यांचे कुटुंबीय गौरी-गणपती सणानिमित्त गावी गेले होते. त्यामुळे ते अंबाजोगाईतील आपल्या भाड्याच्या घरात एकटेच होते. रविवार, 1 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला.
बडतर्फीचे कारण
सुनील नागरगोजे Sunil Nagargoje यांनी परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली होती. लातूरमध्ये ते स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख होते. मात्र, परभणी येथे कार्यरत असताना एका पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या वादामुळे त्यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्यांची बदली बीडमध्ये नियंत्रण कक्षात करण्यात आली. तिथेही त्यांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
सेवेतून बडतर्फ झाल्यानंतर ते प्रचंड नैराश्यात होते, अशी माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या त्यांची मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत, तर अंबाजोगाई येथे त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते.
नागरगोजे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्यांना मिळालेल्या बडतर्फीमुळे आलेले नैराश्य हेच यामागचे प्रमुख कारण असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…