Beed ACB Trap News : बीड येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास पाचशे रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.
बीड :- बीड येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास पाचशे रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले Beed ACB Trap .लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना मध्ये एकलपालक म्हणून शासकीय अनुदान मिळण्यासाठी जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयात फाईल जमा करण्याकरिता पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.कनिष्ठ लिपिक दिलीप क्रिस्टय्या महलंके (54 वय) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांचे बहिणीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना मध्ये एकलपालक म्हणून शासकीय अनुदान मिळवण्याकरिता त्यांचे कागदपत्राची फाईल ही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात जमा करण्याकरिता गेले असता. कनिष्ठ लिपिक महलंके यांनी त्यांना प्रत्येक फाईलची 250 रुपये असे दोन फाईलचे 500 रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष करून लगेच स्वीकारण्याचे मान्य केले आहे.त्यावरुन कनिष्ठ लिपिक महलंके यांच्या कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांचेकडून कनिष्ठ लिपिक दिलीप महालंके पंचासमक्ष लाच रक्कम 500 रुपये स्वीकारताच त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. महालंके यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर ,पर्यवेक्षण अधिकारी शंकर शिंदे पोलीस उपअधीक्षक ला. प्र. वि. बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी युनूस शेख
पोलीस निरीक्षक, ला. प्र.वि .बीड सापळा पथक -हनुमान गोरे ,भारत गारदे, अविनाश गवळी , गणेश मेहेत्रे ,ला. प्र. वि. बीड यांनी कारवाई करत अटक केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…