Beed Crime News : अंगणवाडी सेविकाकडून लाच मागणाऱ्या दोन कर्मचारी महिला एसीबीच्या जाळ्यात
•मिनी अंगणवाडी चे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागितली पाच हजार रुपयाची लाच
बीड :- मिनी अंगणवाडी चे रूपांतर मोठ्या अंगणवाडी करण्यात आली आहे त्याचे बक्षीस म्हणून अंगणवाडी सेविका तिच्याकडे दोन महिला कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयाची लाच मागितले. लाच स्वीकारताना दोन महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी येथील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील एका गावात तक्रारदार महिलेची मिनी अंगणवाडी होती. ती शासनाच्या 10 जानेवारी 2024 च्या जीआर प्रमाणे वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली. मात्र, यासाठी तुमचे चांगले अहवाल पाठवलेले आहेत. त्यामुळे तुमचा पगार 6 हजारांवरून 10 हजार रूपये झाला झाल्याने बक्षीस म्हणून पाच हजार रूपये द्या, अशी मागणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पच्या पर्यवेक्षिका अमृता श्रीकांत हाट्टे आणि कनिष्ठ सहायक निता रामदास मलदोडे यांनी केली. याबाबत अंगणवाडी सेविकेने 30 जुलै रोजी एसीबीकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ( 2 ऑगस्ट ) दुपारी आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा लावला. यावेळी तक्रारदारांकडून पर्यवेक्षिका अमृता हाट्टे आणि कनिष्ठ सहायक निता मलदोडे या दोघींना 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पडले. लाचखोर दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर पर्यवेक्षण अधिकारी व सह सापळा अधिकारी शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.बीड, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – गुलाब बाचेवाड पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि .बीड,सापळा पथक -श्रीराम गिराम, संतोष राठोड , सुदर्शन निकाळजे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, ला. प्र. वि.बीड यांनी सापळा रचून दोन महिला कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक केली आहे.