महाराष्ट्र

Beed Crime News : आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांने मागितली तीस लाखांची लाच

•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड याची धडक कारवाई ; लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांसह खाजगी व्यक्तीला अटक, कट रचून मागितली होती लाच

बीड :- मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट बँकेच्या संस्थापक संचालक बबन शिंदे यांच्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी तक्रारदार याने मटेरिअल पुरवले होते. मोबदला म्हणून साठ लाख रुपये बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते. परंतु तरीही शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे बबन शिंदे व इतर इतरांवर बँक अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आर्थिक गुन्हे शाखा बीड हे संबंधित गुन्ह्याचा तपास करत होते. यातील तक्रारदार आणि साक्षीदार यांना बाबा शिंदे यांनी दिलेले 60 लाख रुपये बँक अपहरणातील असल्याचे भासून तक्रारदार यांच्याकडून पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा पोलीस ठाणे बीड हरिभाऊ खाडे (52 वर्ष), सहाय्यक फौजदार आर्थिक गुन्हे शाखा बीड रवीभूषण जाधवर, आणि खाजगी व्यक्ती कुशाल प्रवीण जैन (29 वर्ष) यांनी कट‌ रचून तक्रारदार यांच्याकडे एक कोटी रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदार व साक्षीदार यांना आरोपी करण्याचा धाक दाखवून तसेच तक्रारदार व साक्षीदार यांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवून यातील लोकसेवक जाधवर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वत:साठी एक लाख रुपये मागणी करुन पोनी खाडे यांना लाच रक्कम मिळुन देण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच पोनी खाडे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना प्रत्येकी 50 लाख या प्रमाने 1 कोटी रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 30 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले .तसेच तक्रारदार यांचेकडुन पहीला हप्ता म्हणुन 5 लाख रुपये खाजगी इसम कुशाल जैन मौजकर टेक्सटाईल यांचेकडे देण्यास सांगितले.
त्यावरुन काल दिनांक 15 मे 2021 रोजी सापळा कारवाईचे आयोजन मौजकर टेक्सटाईल सुभाष रोड बीड येथे केली असता
खाजगी इसम कुशाल जैन याने पोनी हरिभाऊ खाडे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडुन पंचा समक्ष 5 लाख रुपये स्वीकारताच त्यास लाच रकमेसह पकडण्यात आले . पोनी खाडे सहायक फौजदार जाधवर व खाजगी इसम कुशाल जैन यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे .

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक ला. प्र. वि .बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख ला.प्र.वि.बीड,संतोष घोडके पोलीस निरीक्षक ,आणिता ईटुबुने पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. छत्रपती संभाजीनगर, पोलीस हवालदार/अंमलदार अविनाश गवळी , भरत गारदे,अमोल खरसाडे,अंबादास पुरी, हनुमान गोरे , सुरेश सांगळे , स्नेहल कुमार कोरडे ,गणेश मेहेत्रे निकाळजे व नेहरकर डला. प्र. वि.बीड. यांनी कारवाई करत लाचखोर पोलीस अधिकारी आणि खाजगी व्यक्तींना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0