Beed Crime News : वाळू वाहतूकदाराकडून लाच घेताना पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांना अटक

•एसीबीने बीड पोलिसांच्या पिपळनेर पोलिस ठाण्यातील पोलीस अंमलदार रामप्रसाद शिवनाथ कडूळे (36 वय ) आणि होमगार्ड ईश्वर बाबासाहेब जामकर (44 वय) असे आरोपीचे नाव आहे
बीड :- राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) बीड युनिटने पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड वाळू वाहतूकदाराकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.एसीबीने बीड पोलिसांच्या पिपळनेर पोलिस ठाण्यातील पोलीस अंमलदार रामप्रसाद शिवनाथ कडूळे (36 वय ) आणि होमगार्ड ईश्वर बाबासाहेब जामकर (44 वय) असे आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या माहितीनुसार,तक्रारदार यांचे वाळुचे ट्रॅक्टर चालु देण्यासाठी पोलीस अंमलदार कडूळे यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली हि रक्कम होमगार्ड जामकर यांच्या कडे देणेबाबात सांगितलं. होमगार्ड जामकर यांनी पोलीस अंमलदार कडूळे यांच्या सांगण्यावरून आज (23 ऑक्टोबर) रोजी तक्रारदार यांचेकडून लाच घेतली.लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना होमगार्ड यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पिपळनेर पोलीस ठाणे जिल्हा बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीपी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, बाळु जाधवर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.जालना, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अविनाश बाबासाहेब घरबुडे ला.प्र.वि जालना
सापळा पथक पोलीस हवालदार गजानन खरात,भालचंद्र बिनोरकर, जावेद शेख, शिवलिंग खुळे यांनी कारवाई करत लाचखोर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांना अटक केली आहे.