Beed Crime News : अडीच लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सायबर पोलीस हवालदाराला एसीबीचा दणका

Beed Bribe News लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; बँकेचे गोठवलेले खाते पुर्ववत करण्याकरिता सायबर विभागाच्या पोलिसांनी मागितले लाच, पोलीस हवालदार एसीबीच्या रडारवर
बीड :- सायबर पोलीस ठाणे बीड, येथे कार्यान्वित असलेल्या पोलीस हवालदार आशिष मुरलीधर वडमारे यांना एसीबीने लाच मागितल्या प्रकरणी दणका दिला आहे. Police Havaldar Gets ACB Shock for Demanding Lakh in Cyber Scam बँकेचे खाते पूर्ववत करण्याकरिता बीडच्या सायबर विभागाच्या पोलीस हवालदराने अडीच लाखांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी कारवाई करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचा बॅटरी व इनव्हरटर विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने एका आरोपीला ईनव्हरटर व बॅटरी विकल्या होत्या. त्याचे बील आरोपीने त्याचे बॅंक खात्यातुन तक्रारदाराला अदा केले होते. कोणतीही खात्री न करता तक्रारदाराचे एका बॅंकेतील कॅश क्रेडिट खाते हे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे बीड यांच्याकडून गोठवण्यात आले होते. गोठवण्यात आलेले बॅंक खाते पुर्ववत करण्यासाठी तक्रारदाराला आशिष वडमारे यांनी 3 लाख 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. Police Havaldar Gets ACB Shock for Demanding Lakh in Cyber Scam तडजोडीअंती 2.50 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने पंचासमक्ष याची खातरजमा केली. यावरुन आशिष वडमारे याच्यावर शिवाजी नगर पोलिस ठाणण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरेापी फरार आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर पर्यवेक्षण अधिकारी – शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड,
यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड,सापळा पथक पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, श्रीराम गीराम, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि. बीड यांच्याकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.