Beed ACB Trap News : महिला बाल स्वाधार गृहातून सुटका करण्याकरिता 50 हजारांची लाच प्रकरणी बालकल्याण समितीच्या सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी ताब्यात घेतले आहे
बीड :- बाल कल्याण समिती Child Welfare Society सदस्य सुरेश प्रभाकर राजहंस (40 वय, रा. शिंदे नगर कॅनल रोड बीड) यांना लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले आहे. Beed ACB Trap लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड युनिटने कारवाई करत भ्रष्ट सदस्याला 50 हजार लाच प्रकरणी अटक केली आहे. बाल स्वाधार गृहातून सुटका करण्याकरिता लाच मागितली होती. Anti Corruption Bureau Latest News
एसीबीने दिलेल्या माहितीवरून,तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्या करिता 18 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यावरून मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य सुरेश राजहंस यांनी स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता 50 हजारांची लाच मागणी करून तडजोडांती 12 हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य करून सापळा कारवाई दरम्यान 12 हजार रुपये लाच रक्कम स्वतःघेताना सुरेश राजहंस याना बाल कल्याण समिती चे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.शिवाजी नगर पोलीस ठाणे,बीड Beed Shivaji Nagar Police Station येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर पर्यवेक्षण अधिकारी -शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड सापळा पथक – पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि.बीड यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Anti Corruption Bureau Latest News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…