महाराष्ट्र

Beed Bribe News : जमीन सिंचन लाभ क्षेत्रात येत नसल्याने त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी 1 हजार रुपयाची लाच, पाटबंधारे विभागातील दोन कारकुन लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

•उप अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग मधील वरिष्ठ दप्तर कारकुन आणि दप्तर कारकुन यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतले आहे.

बीड :- जमीन सिंचन लाभ क्षेत्रात येत नसल्याने प्रमाणपत्र काढून देण्यासाठी तक्रारदार यांनी उप अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग येथे लेखी अर्ज दाखल केली होती. तसेच, सदर जमीन धारण क्षेत्रात लाभ क्षेत्रात येत नाही याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी उपअभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यालयातील दोन कारकुन यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी कारवाई करत अटक केली आहे. विजयानंद नानाभाऊ तरकसे (46 वय) वरिष्ठ दप्तर कारकुन आणि मदनसिंग सुपडसिंग राजपूत (42 वय) दप्तर कारकुन असे लाच स्वीकारणाऱ्या कारकुन यांचे नावे असून हे दोघेही उप अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग, बीड येथे कार्यरत आहे.

तक्रारदार यांचे वडीलांचे नावे असलेली गट क्रमांक 400 ढोरवाडी शिवार ता.वडवनी येथील 1 हेक्टर जमीन सखाराम डिगे यांना विक्री केली होती . डिगे यांनी जमिन सिंचन लाभ क्षेत्रात येत नसल्याचे प्रमाणपत्र काढून देणे बाबत तक्रारदार यांना विनंती केली होती.डिगे यांचा लेखी अर्ज व इतर कागदपत्रे उप अभियंता कार्यालय , गोदावरी पाटबंधारे विभाग प्रकल्प-3 बीड येथे तक्रारदार यांनी दाखल केले होते.सदरचे धारण क्षेत्र लाभ क्षेत्रात येत नाही. या बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी कारकुन तरकसे यांनी तक्रारदार यांना 1000 रुपयांची मागणी केली .

तक्रारदार यांनी 6 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड येथे समक्ष हजर राहून तक्रार दिली .त्या अनुषंगाने 6 मार्च रोजी आरोपी लोकसेवक तरकसे यांच्याकडे तक्रारदार व पंच क्रमांक 01 यांना पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी कारकुन तरकसे यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतः करिता 1000रुपये लाचेची मागणी केली व फोन पे युपीआय ॲपद्वारे लाच रक्कम कारकुन मदनसिंग राजपुत यांचे फोन पे क्रमांक वर लाच रक्कम पाठवणेबाबत राजपुत यांचे समक्ष सांगितले. दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाणे,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबी पथक

संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शिंदे पोलीस उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड सापळा पथक पोलिस अंमलदार , सफौ सुरेश सांगळे , हनुमान गोरे , श्रीराम गिराम ,संतोष राठोड, अविनाश गवळी ,अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे यांनी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0