महाराष्ट्र

Beed Bribe News : “सरपंचाची ‘विहीर’ लाचखोरीत बुडाली! सापळा रचून 10 हजार घेताना रंगेहात गजाआड!”

ग्रामीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 20 हजार लाचेची मागणी

बीड | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जलसिंचन विहीर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंचाकडून वीस हजार रुपयांची लाच मागणी, आणि ती देखील दोन टप्प्यात! यातील पहिला हप्ता घेताना म्हणजे दहा हजार रुपये रोख रक्कम सरपंच रुक्मानंद खेत्रे ऊर्फ इलोसे (वय 47) यांना एसीबी बीडच्या पथकाने रंगेहात पकडत थरारक सापळा कारवाई केली.

तक्रारदाराच्या आईचे नाव जलसिंचन योजनेत लाभार्थी यादीत आल्यानंतर, पुढील मंजुरीसाठी सरपंच यांच्या ‘ओळखीने काम करून देतो’ या सबबीवर लाच मागितली. साऱ्या योजनेचा प्रस्ताव तयार करणे आणि मंजूर करून घेण्यासाठी त्याने “इंजिनिअरसाठी 10 हजार आणि मॅडमसाठी 10 हजार” अशी मागणी केली होती.

या तक्रारीवर विश्वास ठेवून एसीबी बीडच्या पथकाने माजलगावमध्ये सापळा रचला. आणि अखेर गजानन मंदिर रोडवरील राहत्या घरी इलोसे 10 हजार रुपये स्वीकारताना पंचासमक्ष जेरबंद झाला.

अंगझडतीत 53 हजार 450 रोख, मोबाईल फोन व मनगटातील घड्याळ सापडले. त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून तपासासाठी झडती सुरू आहे. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7A अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येत आहे.

ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राहुल भोळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या पथकात सुरेश सांगळे, पांडुरंग काजगुंडे, अनिल शेळके आदींचा समावेश होता. पोलीस अधिक्षक अधिकारी संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव व पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई झाली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago