क्राईम न्यूज

Beed Bribe News : पन्नास हजारांची लाच स्वीकारताना उपकार्यकारी अभियंतसह प्रधान तंत्रज्ञ, शेतकऱ्याला रंगेहाथ पकडले

Beed MSEB Bribe News : महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी (MSEB) तेलगाव तालुका माजलगाव बीड येथील उपकार्यकारी अभियंत्याला पन्नास हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

बीड :- वीज चोरीच्या प्रकरणात अडकवून दंडात्मक कारवाई करू अशी धमकी देत स्नॅक्स कॉर्नर चालवणाऱ्या तक्रारदारांच्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी (MSEB) तेलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील उपकार्यकारी अभियंता, प्रधान तंत्रज्ञ आणि खाजगी व्यक्ती म्हणून शेतकरी यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. Beed MSEB Bribe News विवेक जनार्दन मवाडे (उपकार्यकारी अभियंता), शेख जलील शेख अब्दुल्ला (प्रधान तंत्रज्ञ), मोईन रशीद मोमिन (शेतकरी खाजगी व्यक्ती) असे लाचखोर व्यक्तींचे नाव आहे. Beed Crime News

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व त्यांचे भावाचे (मौजे पात्रुड ता.माजलगाव ) येथे “आपका नाश्ता, वडापाव स्नॅक्स सेंटर” नावाचे हॉटेल असून उप कार्यकारी अभियंता मवाडे व प्रधान तंत्रज्ञ शेख हे हॉटेल मध्ये वीज चोरी केल्याचा धाक दाखवून 1 लाख 82 हजार रू दंड करतो असे म्हणून वीज चोरीचा दंड न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करीत आहेत.

तक्रारदार यांनी 15 एप्रिल, रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड पथकास पात्रुड, माजलगाव येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने 15 एप्रिल रोजी तक्रारदार व पंच क्रमांक 1 यांना तक्रारदार यांचे आपका हॉटेल, पात्रुड व उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग (तेलगाव ता.माजलगाव) येथे
पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता, शेख यांनी तक्रारदार यांचेकडे वीजचोरीचा 1 लाख 82 हजार रू दंड न करण्यासाठी मवाडे यांचे करिता 50 हजार रू लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले व मवाडे यांनी शेख यांना लाच रक्कम मिळवण्यास प्रोत्साहन दिले.

यातील लोकसेवक शेख यांचे विरूद्ध आज (17 एप्रिल) तक्रारदार यांचे आपका नाश्ता वडापाव व स्नॅक्स हॉटेल येथे सापळा रचून 50 हजार रुपये खाजगी व्यक्ती मोमिन यांचे मार्फतीने पंचासमक्ष स्वीकारली असता शेख व खाजगी इसम मोईन मोमिन यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले आहे. खाजगी इसम मोईन मोमिन यांचेकडून लाच रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. लोकसेवक मवाडे, शेख व खाजगी इसम मोमिन यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी जलील शेख व मोईन रशिद यांना गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले असुन अटक रण्यात आली आहे .

एसीबी पथक
संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजी नगर शंकर शिंदे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. बीड सापळा अधिकारी शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख,पोलिस निरीक्षक किरण बगाटे ,सापळा पथक पोलीस अंमलदार – सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, सुदर्शन निकाळजे, अमोल खरसाडे, संतोष राठोड, गणेश मेहत्रे, अंबादास पुरी, बिबीशन सांगळे ही कारवाई केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

52 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago