Beed Anti Corruption Bureau News : अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून त्याची परवानगी मिळवण्यात यावी यासाठी मागितले होते 30 हजार रुपयाची लाच
बीड :- प्रशांत शिवाजी डोंगरे (29 वर्ष) सहाय्यक नगर रचनाकार तथा प्रभारी नगर रचनाकार बीड, निलेश सोपान पवार (29 वर्ष) अभियंता खाजगी व्यक्ती, शेख नेहाल शेख अब्दुल गणी (30 वर्ष) नोंदनिक्रत अभियंता खाजगी व्यक्ती यांना बीडच्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने अटक Beed Anti Corruption Bureau Department Arrested केली आहे.
तक्रारदार यांना अकृषिक परवानगी काढण्यासाठी 30 हजाराची लाच मागितली होती तडजोडी यांची पंधरा हजार रुपयाची लाच निश्चित झाली आणि ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Beed Anti Corruption Bureau पथकाने तीनही भ्रष्ट आरोपींना अटक केली आहे. Beed Anti Corruption Bureau Latest News
यातील तक्रारदार यांचे यळंब घाट शिवार येथील गट क्रमांक 580 अ (1) मधील 20.50 आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज BPMS पोर्टलवर खाजगी इसम निलेश पवार यांचे मार्फतीने दाखल केला होता. प्रस्ताव उपविभागीय कार्यालय बीड यांचेकडुन पुढील कार्यवाही साठी नगर रचना कार्यालय बीड यांचे कडे ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर दि 26 मार्च रोजी खाजगी इसम निलेश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे लोकसेवक प्रशांत डोंगरे यांचे करीता 30 हजार रुपयाची मागणी केली.तक्रारदार यांचे तक्ररीवरुन दि 2 एप्रिल रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम निलेश पवार यांनी लोकसेवक डोंगरे यांचे करीता 30 हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले . तसेच दिनांक 04 एप्रिल रोजी लोकसेवक प्रशांत डोंगरे यांचे विरुद्ध पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम पवार यांनी मागीतलेली 30 हजार रुपये लाच लोकसेवक डोंगरे यांचेकरीता डोंगरे यांचे सांगण्यावरूनच निलेश पवार यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लोकसेवक डोंगरे यांनी तक्रारदार यांना तडजोड अंती 15 हजार रुपयाची मागणी करुण सदर लाच रक्कम खाजगी इसम शेख नेहाल यांचेकडे देण्यास सांगितली . खाजगी इसम नेहाल याने लाच रक्कम 15 हजार स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले .निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन बीड Beed Police Station शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . Beed Anti Corruption Bureau Latest News
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी -शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक ला. प्र. वि .बीड.पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड सापळा पथक:-हनुमान गोरे , संतोष राठोड,स्नेहल कुमार कोरडे ,गणेश मेहेत्रे डला. प्र. वि.बीड. यांनी बीडच्या नगर रचनेच्या अधिकाऱ्यांसह दोन खाजगी व्यक्तींना लाज स्वीकारताना अटक केली आहे. Beed Anti Corruption Bureau Latest News
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…