Beed Anti Corruption Bureau: तूती झाडाची लागवड करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच, पंचायत समिती गेवराई, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भ्रष्टाचार
Anti Corruption Bureau Arrested Bribe Person : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; तांत्रिक सहाय्यक अधिकाऱ्याला आणि खाजगी व्यक्तीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
बीड :- शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तूती झाडाची लागवड करण्याची होती. या योजनेची फाईल मंजूर करण्यासाठी पंचायत समिती गेवराई जिल्हा बीड, येथील तांत्रिक सहाय्यक अधिकारी संदीप रोहिदास राठोड (34, वर्ष) यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयाची लाच मागितली होती. 10 Thousand Bribe लाचलुजपत प्रतिबंध विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई करत पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकाला आणि खाजगी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. शासनाच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. Anti Corruption Bureau Latest News
गॅरेजवर लाच स्वीकारताना एसीबीची धाड
शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती. त्यासाठी तक्रारदार यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फाईल मंजूर करण्यासाठी पंचायत समिती गेवराई तांत्रिक सहाय्यक संदीप राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयाची पंचासमक्ष मागणी केली होती. तसेच ही रक्कम चंद्रकांत धर्मराज शेळके (25 वर्ष, फिटर,माऊली ऑटो गॅरेज,गेवराई) याच्याकडे जमा करण्यासाठी सांगितली होती. एसीबीने सापळा रचून माऊली हॉटेल गॅरेज सिव्हिल सर्कल ग्रामीण हॉस्पिटल जवळ स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. तसेच आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात Gevrai Police Staion गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, राजीव तळेकर पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संगीता पाटील पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सापळा पथक – पोलीस हवालदार, सुनील पाटील, पोलीस अंमलदार, विलास चव्हाण ,सी. एन. बागुल ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी आरोपींना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.