Beed Anti Corruption Bureau News : बीडमधील कारवाई महसूल विभागात खळबळ,दोन लाखांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला एसीबीने केले अटक
Beed Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बीड यांची कारवाई दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला एसीबीने घेतलं ताब्यात
बीड :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी कारवाई Beed Anti Corruption Bureau करत मंडळ अधिकाऱ्याला लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक केली आहे. अटक केलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव सचिन भागवत सानप (39 वर्ष) आहे.मुरुम उत्खनन जागेचा पंचनामा करून हजार ब्रास ऐवजी 500 ब्रास दाखवून तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी सानप यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. Beed Anti Corruption Bureau News
बीड एसीबीने सचिन भागवत सानपला दोन लाखांची लाच मागण्या प्रकरणी अटक केली.
तक्रारदार यांचे नातेवाईक व ईतरा विरुद्ध पोलीस स्टेशन पिंपळणेर येथे मुरुम उत्खनन संदर्भात गुन्हा दाखल आहे. गुन्हयासंदर्भाने यातील मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी बीड, तरफ खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक 49 मधील मुरुम उत्खनन जागेचा पंचनामा केला होता . पंचनाम्यात 1000 ब्रास ऐवजी 500 ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी सचिन सानप यांनी पंचासमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 1.50 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले .पहिला हप्ता 1 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आहे . त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर , जुना नगर नाका बीड येथे सापळा रचून कारवाई केली असता मंडळ अधिकारी सचिन सानप यांना तक्रारदार यांचे कडुन 1 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताच त्यांना लाच रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. लोक सेवक सचिन सानप यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे . Beed Anti Corruption Bureau News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.,मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सापळा अधिकारी-शंकर शिंदे ,पोलीस उप अधिक्षक ,बीड,सह सापळा अधिकारी- युनुस शेख पोलिस निरीक्षक ला.प्र.वि.बीड,सापळा पथक -सुरेश सांगळे,श्रीराम गिराम , भरत गारदे , अमोल खरसाडे, हनुमान गोरे , संतोष राठोड , अविनाश गवळी , सुदर्शन निकाळजे , अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि.बीड यांनी कारवाई करत मंडळ अधिकाऱ्याला अटक केली आहे.