क्राईम न्यूजमहाराष्ट्र

Beed Anti Corruption Bureau News : अभियंता आणि त्यांच्या पत्नीवर एसीबीचे कारवाई, बेकायदेशीररित्या संपत्ती कमवल्याचा आरोप..

Beed Anti Corruption Bureau News : एकूण उत्पादनापेक्षा 200% हून अधिक संपत्ती असल्याचा एसीबीचा ठपका, अभियंता आणि त्यांच्या पत्नीवर बीडच्या आंबेजोगाई मध्ये गुन्हा दाखल

बीड :- तात्कालीन आंबेजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे (सध्या पदभार :- कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई) विरुद्ध 22 फेब्रुवारी 2022 रोजी पाच प्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एसीबी ने आंबेजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा (Ambejogai Police Station) दाखल देखील करण्यात आला होता. त्यानंतर एसीबीने त्यांच्या मालमत्तेच्या चौकशी करिता परीक्षण करण्यात आले. Beed Anti Corruption Bureau News

ACB action against engineer and his wife

एक सप्टेंबर 2010 ते 22 जून 2022 पर्यंतच्या कालावधीत तात्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई संजय कुमार शशिकांत कोकणे यांच्या उत्पन्नामध्ये कायदेशीर मार्गाने व ज्ञात असलेल्या उत्पादनापेक्षा 238.84 टक्के म्हणजेच तीन कोटीहून अधिक संपत्ती असल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले. तसेच त्यांची पत्नी ज्योती संजय कुमार कोकणे यांच्या नावे एक कोटी बारा लाख 60 हजार रुपयाची अप संपत्ती असल्याचे एसीबी च्या निदर्शनास आले आहे. Beed Anti Corruption Bureau News

एसीबीने आता या प्रकरणात कोकणे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ ज्योती कोकणे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 13(1),ब व 13(2),12 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमन 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप आटोळे , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर, मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी,पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक युनुस शेख हे करत आहेत. Beed Anti Corruption Bureau News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0