Beed ACB Trap | हॉटेलवरील कारवाई टाळण्यासाठी प्रांत अधिकारी यांच्या नावाने लाच घेताना तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे ACB SP Sandeep Aatole
- Beed ACB Trap | पोलीस अधीक्षक संदीप आटोळे ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून कारवायांचा सपाटा
बीड, दि. २७ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर :
Beed ACB Trap | हॉटेलवरील कारवाई टाळण्यासाठी प्रांत अधिकारी यांच्या नावाने लाच स्वीकारणारा तलाठी रंगेहाथ सापडला आहे. स्वतः करीता व उप विभागीय अधिकारी यांच्यासाठी ७ हजार रुपये स्वीकारताना तलाठी रंगेहाथ सापडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक संदीप आटोळे ACB SP Sandeep Aatole यांच्या मार्गदर्शनाखाली लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. Beed ACB Trap
संशयित आरोपी लोकसेवक निलेश धर्मदास मेश्राम, वय 31 वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी- सजा (मांजरसुंबा ) प्रतिनियुक्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय, बीड उपविभाग, येथे कार्यरत आहेत.
आज दि. २७ रोजी कौटुंबिक न्यायालय, जुनी इमारत उपविभागीय अधिकारी कार्यालय रूम क्रमांक(109 ) बीड येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे गेवराई हद्दीत राक्षसभुवन रोड वर जय हिंद नावाचे हॉटेल असून सदर हॉटेल वर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलीस ठाण्याकडून मुं .दा.का 65 (ई) प्रमाणे दोन गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून मु. दा.का. कलम 93 (ब) प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी नोटीस
बजावण्यात आली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने बंधपत्र लिहून घेण्यासाठी व सदर प्रकरण बंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तलाठी निलेश मेश्राम यांनी स्वतःसाठी 2 हजार रुपये व उप विभागीय दंडाधिकारी मॅडम यांच्यासाठी 5 हजार रुपये अशी एकूण 7 हजार रुपये लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष करून सदर लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली. आरोपी लोकसेवक तलाठी यास ताब्यात घेण्यात आले असून पोस्टे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदर कारवाई ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी हरीदास डोळे, पोलीस निरीक्षक, सहायक सापळा अधिकारी वाल्मीक कोरे, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार साईनाथ तोडकर, पोअं, राजेंद्र नंदिले , चालक सी. एन. बागुल यांनी केली आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य कोणीही लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ टोल फ्री क्र:- 1064 संपर्क साधण्याचे आवाहन लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले आहे.
- पोलीस अधीक्षक संदीप आटोळे