Barshi News | बार्शीच्या मॅनेजरची पुण्यात हत्या : आरोपी ताब्यात
Barshi News
पुणे, दि. 21 मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)
बार्शीतून नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या मॅनेजरची कामगारांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीतून कामावरून घरी जात असलेल्या मॅनेजरवर रस्त्यात अडवून जीवघेणा हल्ला करण्यात आला. मंगळवारी दि. 19 हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. Barshi News
सुधीर मच्छिंद्र अडसूळ (Sunil Machchindra Adsul) (वय 47, रा. मावळ. मूळ रा. बाभूळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीतील कर्मचारी किरण मानसिंग भोसले (वय 47, रा. मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Barshi News
पोलिसांनी कंपनीतील कामगार कुमार ओझरकर (Kumar Ozarkar) (वय 25, रा. शिवणे, मावळ) याला शिरगाव पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी कुमार हा मानेग्रो कंपनीत काम करतो. तिथेच अडसूळ हे मॅनेजर पदावर काम करत होते. अडसूळ हे कंपनीतील कामे सतत सांगतात असा राग कुमार याच्या डोक्यात होता. त्यावरून त्यांच्यात पूर्वी शाब्दिक खटके उडाले होते.
अडसूळ हे दुचाकीवरून कंपनीतून घरी जात होते. त्यावेळी आरोपीने दुचाकीवरून येऊन कंपनीपासून काही अंतरावर अडसूळ यांना अडवले. त्यांना स्टीलच्या पाईपने डोक्यात आणि शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली. या हल्ल्यात अडसूळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.