Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी | उपमुख्यमंत्रीपदाच्या 6 महिन्यांच्या अटीसाठी बारामतीतून मैदानात
मुंबई :- अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने धक्का सावरत आता संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. मुंबईतील वरळी डोम येथे आज होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता त्यांच्याकडे पक्षाची राष्ट्रीय धुरा सोपवून महिला नेतृत्वाला बळ देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.
बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवार स्वतः उमेदवार
अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. 10 मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर कधीही निवडणुकीचे बिगुल वाजू शकते.
संवैधानिक सक्ती: संविधानाच्या कलम 164(4) नुसार, मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे ही अट पूर्ण करण्यासाठी त्या बारामतीतून स्वतः निवडणूक लढवणार आहेत.
बिनविरोधसाठी प्रयत्न: बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे, मात्र विरोधी पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्थ पवार जाणार राज्यसभेवर
मुंबईत प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तरुण नेतृत्वाला दिल्लीच्या राजकारणात संधी देऊन पक्षाने मोठी रणनीती आखली आहे. या निर्णयामुळे पवार कुटुंबातील तिसरी पिढी आता संसदेत पाऊल ठेवणार आहे.
वरळीच्या अधिवेशनात शक्तीप्रदर्शन
आज 26 फेब्रुवारी रोजी वरळी येथे होणाऱ्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद आणि पार्थ पवार यांना राज्यसभा उमेदवारी देऊन पक्षाने आपली भविष्यातील दिशा स्पष्ट केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…