पुणे

Baramati loksabha Election 2024 : अजित पवार यांचा अर्ज नामंजूर, सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध, शरद पवार यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज मंजूर

•बारामती लोकसभा क्षेत्रामध्ये आता थेट नणंद भावजयी यांच्या सामना रंगणार

पुणे :- बारामतीत एकाच कुटुंबात लढत होणार आहे. ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सून सुनेत्रा पवार यांच्यात मुकाबला होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी आपलं बळ लेकीच्या पारड्यात टाकलं आहे. तर अजित पवार यांनी पत्नीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्यास दावा कायम राहावा म्हणून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित दादांचाच अर्ज बाद झाला आहे.बघतोय रिक्षावाला’ संघटना पुरस्कृत उभे असलेले अपक्ष उमेदवार, रिक्षाचालक शरद राम पवार यांचा बारामती लोकसभेसाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे हा अर्ज वैध झाला असून प्रशासनाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत पवार घराण्यात निवडणूक होत असतानाच शरद पवार नावाचा व्यक्ती मैदानात उतरल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे. Baramati loksabha Election 2024

सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर शरद पवार गटाकडून डमी अर्ज भरलेल्या सचिन दोडकेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाने आज अर्ज छाननीसाठी अनेकांना बोलावलं होतं. एकाच पक्षाचे दोन अर्ज असल्यामुळे एकाच उमेदवाराचा अर्ज मंजूर करण्यात आला. तर डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध ठरल्याने आता दोन्ही नणंद-भावजयांमध्ये थेट लढत होणार आहे. Baramati loksabha Election 2024

बारामती लोकसभा मतदरासंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 7 मे रोजी हे मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी बारामतीसह 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. तर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Baramati loksabha Election 2024

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0