Baramati Lok Sabha News : नणंद भावजय यांची गळाभेट..
Baramati Lok Sabha News : बारामती मध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा सुळे असा लोकसभेला सामना पाहायला मिळणार आहे.
पुणे :- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत Baramati Lok Sabha बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याच्या चर्चा राजकीय चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीत सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता या दोघींच्या भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे. विशेष म्हणजे यावेळी दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतल्याने तर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Baramati Lok Sabha News
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. शरद पवार गटाने सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारच अजित पवार गटाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले आहे. Baramati Lok Sabha News
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची बारामतीत काल अचानक भेट झाली. या भेटीदरम्यान दोघींनी गळा भेट घेत सुहास्य वदनाने एकमेकिंचे स्वागत केले. बारामती मधील जळोची येथे महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोघींनी हजेरी लावली.या कार्यक्रमासाठी संयोजकांनी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रथम सुनेत्रा पवार त्या ठिकाणी आल्या व त्या पाठोपाठ सुप्रिया सुळे तिथे पोहोचल्या. दोघींनी एकमेकांना पाहताच गळाभेट घेत हसून स्वागत केले. तसेच त्यांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्या दोघी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी निघाल्या. Baramati Lok Sabha News