Baramati Lok Sabha Election : यवत मध्ये शरद पवार यांच्या सभेला तुफान गर्दी विरोधकांसाठी डोकेदुखी ; लेकीसाठी मैदान मारलं
- पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंनाच खासदार करायचे ! आ. रोहित पवार यांचे आवाहन
- मतांची भाकरी मोठ्या प्रमाणात फिरणार
Baramati Lok Sabha Election News : – दौंड, ता. ( प्रतिनिधी हरिभाऊ बळी ) १६ बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार Sharad Pawar Group गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे Supriya Sule ह्या तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या Baramati Lok Sabha Election रिंगणात उतरून आपले नशिब अजमावत आहेत. सध्या त्यांनी निवडणूक प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. सुळे यांना संसदेत काम करण्याचा मागील दहा वर्षाचा दांडगा अणुभव आणि मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेवर त्यांचे असलेले प्रभूत्व आणि प्रत्येक प्रश्नाला तितक्याच ताकदीने उत्तर देण्याचा हजर जबाबी पणा यामुळे सुप्रिया सुळे यांना संसदेत आनेक वेळा उत्कृष्ट संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लेक सुप्रिया सुळे यांना बारामतीतून विजयी करण्यासाठी सोमवारी यवत येथील बाजार मैदानात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणेसह, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने शरद पवार पक्षात प्रवेश केला. दौंड तालुका हा आ. राहुल कुल, आणि माजी आ. रमेश थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. एक आमदार आणि एक माजी आमदार असे दोन आमदार यांचेसह मोठी फळी दौंड तालुक्यात आसली तरी शरद पवार यांना माननारा वर्गही या तालुक्यात फार मोठा आहे. हे या कालच्या झालेल्या शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांनी दाखवून दिले आहे. Baramati Lok Sabha Election Update
त्यामुळे सध्याचे वातावरण पाहता दौंड तालुक्यात शरद पवार गट आघाडीवर आहे. त्यातच माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणेआणि त्यांचेसह हजारो कार्यकर्ते यांचा शरद पवार गटात झालेला पक्ष प्रवेश यामुळे तालुक्यातील मतांची भाकरी मोठ्या प्रमाणात फिरणार असल्याने याचा फटका मतांच्या रुपाने कोणाला बसणार हे मैदानातून पवार यांनी दाखवून दिले आहे.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पवारांच्या उपस्थितीत यवत मध्ये शेतकरी मेळावा आणि नामदेव ताकवणे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा पक्ष प्रवेश पार पडला. अनेक गावांमधील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने शरद पवार पक्षात प्रवेश करून दौंड मध्ये तुतारी वाजणार हे विरोधकांना दाखवून दिले. या मेळाव्याला रोहित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला लोकांनीही तुफान गर्दी केली होती. उपस्थितांच्या तुफान गर्दीवर शरद पवार आणि नातू रोहित पवार यांनी मोजक्या शब्दात विरोधकांच मोजक्या शब्दात कान टोचले. Baramati Lok Sabha Election Update
मी कोणाचं नावं घेणार नाही. परंतु दौंड च्या नेत्यांना अनेक वर्षांपासून मी सतत म्हणत आलो आहे कि दौंड तालुक्यात उद्योग – धंदे, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मला १० ते १५ एकर शेती उपलब्ध करून द्या. मी दौंड तालुक्यात सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतो. असे हि शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. Baramati Lok Sabha Election Update
उपस्थितांच्या तुफान गर्दीवर
रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला, “आम्ही विकासासाठी गेलो, विकासासाठी गेलो” पण कोणाच्या विकासासाठी गेलात फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या विकासासाठी गेलात. अशी सडकून टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरदचंद्र सुर्यवंशी यांनी विरोधकांचा मोजक्या शब्दात समाचार घेतला. यावेळी रोहित पवार, आ. अशोक पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, सदाशिव सातव, आप्पासाहेब पवार, सचिन काळभोर, दादा पवार, विठ्ठल दोरगे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.