Baramati Lok Sabha Election : बारामतीत पैशाचा पाऊस… आमदार रोहित पवार यांचे ट्विट

Rohit Pawar tweet On Baramati Lok Sabha Election : Y दर्जाचे सुरक्षा देत पोलीस बंदोबस्तात, बारामतीत पडतोय पैशाचा पाऊस
पुणे :- 7 मे ला राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे Lok Sabha Election मतदान आहे. शरद पवार Sharad Pawar आणि अजित पवार Ajit Pawar यांच्या प्रतिष्ठेचे मानली जाणारी बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election मध्ये आज मतदान होत आहे. कालच्या मध्यरात्री भोर तालुक्यात पैसे वाटप करण्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट करत बारामती मध्ये चक्क पोलीस बंदोबस्तात पैशाचा पाऊस पडत असल्याचा ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती मधून नंनदविरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. या लढतीमध्ये पवार कुटुंबामध्ये अनेक वाद विवाद विकोपाला गेले आहे. यामध्ये प्रचाराचे महत्त्वाची भूमिका बजावणारे रोहित पवारांनी काका अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करा एकच खळबळ उडविली आहे. Baramati Lok Sabha Election Live Update

आमदार रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत…यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा? त्यांनी या ट्विट बरोबर भोर तालुक्यातील पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.तसेच त्याबद्दलचे व्हिडिओही त्यांनी आपल्या ट्विटर मध्ये शेअर केले आहे. Baramati Lok Sabha Election Live Update