Baramati Latest News : बारामती पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! 3.83 लाख मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध; सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार

Baramati Political Latest News : अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीचा गड सुनेत्रा पवारच लढवणार; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून रचला इतिहास
बारामती :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या अकाली आणि अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी 10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, बारामतीमध्ये आता एकूण 3 लाख 83 हजार 767 मतदार आपला कौल देणार आहेत.
मतदारसंख्येचे गणित
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छाननी करून ही अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.
एकूण मतदार: 3,83,767
पुरुष मतदार: 1,93,496
महिला मतदार: 1,90,271
इतर: 24
सुनेत्रा पवार सांभाळणार धुरा
अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. संविधानाच्या कलम 164(4) नुसार, त्यांना 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य असल्याने त्या बारामतीतून मैदानात उतरणार आहेत.
कोण आहेत सुनेत्रा पवार?
राजकीय वारसा: 18 ऑक्टोबर 1963 रोजी जन्मलेल्या सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. 1985 मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला.
सामाजिक कार्य: काटेवाडीत ग्रामस्वच्छता अभियानातून त्यांनी कार्याला सुरुवात केली, ज्याची दखल जागतिक स्तरावर ‘सार्क’ देशांच्या परिषदेत घेतली गेली.
संस्थात्मक कार्य: ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि ‘बारामती टेक्सटाईल पार्क’च्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.
राजकीय प्रवास: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्या राज्यसभा खासदार झाल्या आणि आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहत आहेत.



