पुणे

Baramati Crime News : बारामती तलाठी कार्यालयात पाच हजाराची लाच स्वीकारणारा तो व्यक्ती झाला गजाआड

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची कारवाई ; बारामती तलाठी कार्यालयात मागितली लाच, वारसा नोंद करण्याकरिता तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तीकडून पाच हजाराची..

पुणे :- वारसनोंद करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बारामतीत शुक्रवारी (17 मे) पकडले.चंद्रकांत परबत जावळकर (50 वर्ष, रा. बारामती) याने वारसनोंद करून देण्यासाठी तलाठ्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यापैकी तीन हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ त्याला ताब्यात घेतले.

तक्रारदाराच्या सासऱ्याच्या नावावरील कसबा येथील जागेवर तक्रारदाराच्या पत्नीची वारस म्हणून नोंद लावण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही नोंद लावण्यासाठी खाजगी इसम चंद्रकांत जावळकर याने तलाठ्याच्या करिता पाच हजार रुपयांची लाच मागणी केली होती, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली, तेव्हा खाजगी एजंट चंद्रकांत जावळकर याने बारामतीच्या तलाठ्यासाठी तक्रारदाराकडे पत्नीची वारस नोंद करण्यासाठी पंचायत समक्ष तडजोड करून चार हजार रुपयांची लाच मागितली आणि तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची प्रत्यक्ष लाच घेताना चंद्रकांत जावळकर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.

vivek

Recent Posts