Bapusaheb Pathare | वडगाव शेरी मतदार संघातील जनतेच्या मनातील ‘आमदार’ शरद पवारांच्या गोटात
bapusaheb pathare enters in sharad pawar ncp
- Bapusaheb Pathare | बापूसाहेब पठारे यांचा शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे, दि. १७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Bapusaheb Pathare
पुण्यातून भाजपचे विसर्जन करण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. वडगाव शेरी मतदार संघातील जनतेच्या मनातील ‘आमदार’ बापूसाहेब पठारे Bapusaheb Pathare यांना (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षात घेत पुण्यातील आणखी एक जागा शरद पवारांनी ‘फिक्स’ केली आहे. आज बापूसाहेब पठारे यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी ‘तुतारी’ हातात घेत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
महायुतीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात समन्वय दिसून येत नाही. इच्छुक आणि प्रस्थापित आमदार यांच्यातील मतभेद दूर न झाल्याने अनेक ठिकाणी ‘खटका’ उडाला आहे. याच संधीच सोन शरद पवार करत आहेत. वडगाव शेरी मतदार संघात बापूसाहेब पठारे यांचे प्राबल्य आहे. पठारे कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे.
माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
बापूसाहेब पठारे हे २००९ मध्ये पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यानंतर २०१४ साली भाजपाचे नेते जगदीश मुळीक हे आमदार झाले. त्या निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे बापूसाहेब पठारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्या भागातील प्राबल्य लक्षात घेऊन २०१९ निवडणुकीत भाजपाकडून बापूसाहेब पठारे यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना भाजप नेतृत्वाने संधी दिली. मात्र त्या निवडणुकीत जगदीश मुळीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.या तीनही निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल पाहता आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहिल्यानंतर भाजपाचे नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार गटात परतण्याचे संकेत दिले होते.
बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे यांचा शरद पवार पक्षात प्रवेश 🚩 (youtube.com)