देश-विदेश
Trending
Banned OTT Platform List | २० व्हल्गर ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी : भारत सरकारकडून मोठी कारवाई
Banned OTT Platform List | व्हल्गर अश्लील व हिंसक कन्टेन्ट दाखवून युवा पिढीला भ्रमित करणाऱ्या २० ओटीटी प्लॅटफॉर्म, 12 फेसबुक पेजेस, 17 इन्स्टाग्राम पेजेस, 16 एक्स (ट्विटर) हँडल्स आणि 12 यूट्यूब चॅनल्स वर भारत सरकार कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देशात अश्लील कन्टेन्ट दाखवणाऱ्या 18 OTT प्लॅटफॉर्म्सना (Banned OTT Platform List) सरकारने ब्लॉक केलं आहे. तसेच वेबसाईट्स, अॅप्स आणि या ओटीटींचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत. आयबी मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.
सदर बाबत X वर माहिती प्रकाशित होताच, अनेक X युजर्स यांनी Alt Balaji, Ullu या ओटीटी प्लॅटफॉर्मवर का बंदी घालण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर झाली कारवाई – Banned OTT Platform List
- रॅबिट (Rabbit)
- निऑन एक्स व्हीआयपी (Neon X VIP)
- हंटर्स (Hunters)
- हॉट शॉट्स व्हीआयपी (Hot Shots VIP)
- मोजफ्लिक्स (Mojflix)
- मूडएक्स (MoodX)
- बेशरम्स (Besharams)
- अनकट अड्डा (Uncut Adda)
- ट्रिफ्लिक्स (Tri Fliks)
- एक्स प्राईम (X Prime)
- न्यूफ्लिक्स (Nuefliks)
- प्राईम प्ले (Prime Play)
- चिकूफ्लिक्स (Chikooflix)
- फुगी (Fugi)
- एक्स्ट्रामूड (Xtramood)
- ड्रीम्स फिल्म्स (Dreams Films)
- वूव्ही (Voovi)
- येस्मा (Yessma)