Bangladeshi Migrants Arrested : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बांगलादेशींचा नागरिकांचा सुळसुळाट
Mira Road Police Arrested Bangladeshi Migrants : बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळले., एक पुरुष आणि चार महिलांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई
मिरा रोड :- नववर्षाच्या पहिल्याच 10 दिवसांमध्ये मुंबईतून 81 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. Mumbai Police Arrested Bangladeshi Migrant त्यानंतर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, या परिसरातून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशीय नागरिकांना अटक केली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मिरा रोड भाईंदर पथकाने कारवाई करत एक पुरुष आणि चार महिलांना अटक केली आहे.बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पुरुष आणि एक महिला अशा दोन बांगलादेशी नागरिकांना जेरबंद केले आहे. तसेच न्याय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 बांगलादेशी महिला नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे यांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा करत दोन पंचासमक्ष चार महिला आणि एक पुरुष अशा पाच बांगलादेशी नागरिकांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी पाचही बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3, 4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 13, 14-अ (ब) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, सहाय्यक फौजदार रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपूत, केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे, पोलीस हवालदार सम्राट गावडे सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर तसेच महिला पोलीस हवालदार नम्रिता यादव, नेम- मनुष्यवध पथक, गुन्हे शाखा, महिला पोलीस शिपाई जयवंती ववासे, नेमणुक प्रशासन विभाग, गुन्हे शाखा यांनी केली आहे.