क्राईम न्यूजमुंबई

Bangladeshi Illegal Migrant : बांग्लादेशातून आलेली मरिया खातुन भामटी सिद्ध; बनावट पासपोर्टसह 6 वर्षं परदेशात वावर

Illegal Bangladeshi Citizen : 15व्या वर्षी भारतात पाऊल; लग्न, कागदपत्रं, पासपोर्ट… सगळं बनावट!

मुंबई :- 33 वर्षांपूर्वी गरीबी आणि भुकेपासून पळ काढत भारतात आलेली बांग्लादेशी महिला अखेर कायद्याच्या कचाट्यात अडकली. Illegal Bangladeshi Citizen मरिया खातुन मोहम्मद मन्सूर अली (वय 48) असं या महिलेचं नाव असून, ती कुवैतहून मुंबई परतताना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली.

मरिया खातुन 1992 मध्ये अवघ्या 15 व्या वर्षी भारतात आली. येथे आल्यावर तिने अरविंदकुमार हीरालाल नावाच्या भारतीय नागरिकाशी विवाह केला आणि त्याच्या ओळखीचा गैरवापर करत स्वतःस भारतीय नागरिक दर्शवून बनावट कागदपत्रं तयार केली.

या कागदपत्रांच्या आधारे तिने 2016 मध्ये मुंबईतील पासपोर्ट कार्यालयातून भारतीय पासपोर्ट मिळवला आणि दोन वेळा त्याचे नूतनीकरणही केले. 2019 मध्ये ती रोजगारासाठी कुवैतला गेली आणि तब्बल सहा वर्षं तिथे राहून काम करत होती.

25 मे रोजी पहाटे 2.38 वाजता ती परत भारतात आली, मात्र इमिग्रेशन अधिकारी समीर गैबू पठाण यांच्या लक्षात तिच्या दस्तावेजांमधील विसंगती आली. अधिक चौकशीत मरियाने अखेर कबूल केलं की ती मूळची बांग्लादेशची नागरिक असून भारतात बेकायदेशीरपणे राहत होती.

त्यानंतर तिला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून, तिच्याविरोधात भारतीय पासपोर्ट अधिनियम तसेच जालसाजीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तिची चौकशी सुरु आहे, आणि यामध्ये आणखी किती जण सहभागी होते, याचाही शोध घेतला जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0