महाराष्ट्र
Trending

Baner Police Awareness | बाणेर पोलिसांकडून टेकडीवरील सुरक्षेसाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांचा लोकोपयोगी उपक्रम
  • पहिल्यांदाच पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधल्याने नागरिकांनी केले कौतुक

पुणे, दि. २६ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर Baner Police Awareness

Baner Police Awareness | बाणेर baner टेकडीवर झालेल्या गुन्हेगारी घटनांची बाणेर पोलिसांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. टेकडीवरील गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलिसांनी थेट जनतेशी संवाद साधत सुरक्षेचे धडे दिले आहेत. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी Police Inspector Mahesh Bolkotgi यांच्याकडून संवाद साधण्यात आल्याने नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.

Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार CP Amitesh Kumar यांच्या सूचनेप्रमाणे आज दि. २६ रोजी मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी बाणेर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्याकडून बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हे व त्या अनुषंगाने नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे , पोलिसांची भूमिका व कर्तव्ये , बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता यासाठी सूचना देण्यात आल्या.

  1. तात्काळ मदतीकरिता 24*7 कार्यरत असणारे helpline क्र 112 नंबर 100 नंबर
  2. ⁠पुणे शहर पोलीस व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
  3. ⁠जेष्ठ नागरिक यांच्याकरिता बाणेर पो ठाणे क्रमांक व त्यांच्याकरिता राबविण्यात येत असलेली उपाययोजना
  4. ⁠एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहिती संकलन व मदत करणे
  5. ⁠सायबर गुन्हे फसवणूक बाबत माहिती
  6. ⁠बाणेर पोलीस ठाणेचा क्रमांक लोकेशन
  7. ⁠ बाणेर टेकडीवर जाणारे नागरिक यांचे करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक त्याचेवर अत्यावश्यक सेवा,बाणेर पोलीस ठाणे,पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांचे क्रमांक व व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
  8. ⁠बाणेर परिसरामध्ये चालू करण्यात येणारे पोलीस मदत केंद्र
  9. ⁠मा पोलीस आयुक्त पुणे शहर सरांनी पुणे शहरातील सर्व टेकड्या या CCTV निगराणीखाली करण्याबाबत लावण्यात येणारे कॅमेरे बाबत माहिती
  10. ⁠टेकड्यांवर लावण्यात येणारे PA सिस्टीम
  11. ⁠AKSA LIGHTS
  12. ⁠पोलीस गस्त , पोलीस SCANNER

कार्यक्रमास एकूण 200 ते 300 नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सायंकाळी 6 ते पहाटे 5 पर्यंत बाणेर टेकडीवर कोणीही जाऊ नये असे मत मांडण्यात आले. PEOPLE AWARNESS बाबतचा पोलिसांचा जनतेशी संवादपर असलेला हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेण्यात यावा याबाबत सूचना केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0