क्राईम न्यूज

Bandu Andekar: आयुष कोमकर हत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई: बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Ayush Komkar Murder Case : घरावर छापा टाकून 67 लाखांचे दागिने, रोख रक्कम आणि अलिशान कार जप्त

पुणे :- नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोळ्या झाडून हत्या झालेल्या आयुष कोमकर प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरच्या Bandu Andekar आर्थिक साम्राज्यावर पुणे पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आंदेकर कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर, पोलिसांनी त्याच्या आर्थिक स्रोतांवरच घाव घातला आहे.

आंदेकर कुटुंबियांचा पोलिसांवर गंभीर आरोप

15 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीमध्ये आंदेकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर याला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते आणि जर तो आला नाही तर त्याचा ‘एन्काऊंटर’ करण्याची धमकी दिल्याचे कुटुंबियांनी न्यायालयात सांगितले. या आरोपानंतर पोलिसांनी आंदेकरच्या आर्थिक नाड्या आवळण्याची मोहीम तीव्र केली आहे.

कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त

या मोहिमेअंतर्गत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकरच्या घरावर छापा टाकला. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल लागला आहे. पोलिसांनी घरातून 67 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदी, 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध मालमत्तेचे करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या जप्त केल्या आहेत.

यासोबतच, बंडू आंदेकरच्या प्रमुख आर्थिक स्रोतांपैकी एक असलेल्या गणेश पेठेतील बेकायदा मासळी बाजारावरही पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे. या बेकायदा बाजारातून आंदेकरला मोठा आर्थिक फायदा होत होता. पोलिसांनी त्याच्यावर एकाच वेळी वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर कारवाई करत त्याचा आर्थिक कणा मोडला आहे.

vivek

Recent Posts