क्राईम न्यूजमुंबई
Trending

Navi Mumbai Bribe News : ‘लाच मागणारा लिपिक रंगेहात अडळा!”CBD बेलापूर येथील टेलिकॉम विभागातील लघुलेखक नरेंद्र हिरेवर एसीबीची कारवाई

Navi Mumbai Latest Bribe News : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या देयकासाठी मागितले साडेचार लाखांचे लाचेचे सौदे

नवी मुंबई | टेलिकॉम मोबाईल विभाग, सीबीडी बेलापूर येथील लघुलेखक (वर्ग 2) नरेंद्र मुरलीधर हिरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ठाणे यांच्याकडून रंगेहात पकडण्यात आले. Anti Corruption Bureau Thane सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या थकीत देयकांसाठी मदत करण्याच्या बदल्यात तसेच विभागीय चौकशीत क्लिन चिट मिळवून देण्यासाठी सुमारे 4.5 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. Navi Mumbai Latest Bribe News

तक्रारदार हे सिडको कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले असून, त्यांची पेन्शन, व्याजासह रक्कम आणि उपदानासाठी हिरे यांनी व्यवस्थापकीय अधिकारी प्रमदा बिडवे यांच्यासाठी 3 लाख रुपये, विभागीय चौकशी अधिकारी चंदलाल मेश्राम यांच्यासाठी 1 लाख रुपये, आणि स्वतःसाठी 50 हजार रुपये, अशी एकूण 4लाख 50 हजार लाच मागितल्याची माहिती ACB कार्यालयास प्राप्त झाली होती.

पडताळणीदरम्यान हिरे यांच्याकडून स्वतःसाठी 50 हजार व चौकशी अधिकाऱ्यासाठी 1 लाख रुपये अशी 1.50 लाखाची मागणी स्पष्ट झाली. त्यानुसार ACB ठाणे युनिटने दिनांक 20 जून 2025 रोजी सापळा रचून दुपारच्या नरेंद्र हिरे यांना रंगेहात अटक केली.या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ACB विभाग करत आहे.

शिवराज पाटील – पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे; सुहास शिंदे – अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे; संजय गोविलकर – अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0