Mumbai Murder News : दर्याच्या जागेच्या मालकी हक्कावरून एका व्यक्तीची निर्घण हत्या
मुंबई :- राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई मधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्र सरकारने वक्फ कायद्यावरून मुस्लिम समाज एकीकडे आक्रमक झाला असताना दुसरीकडे मुंबईत अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे दर्ग्याच्या जागेवरून वाद झाल्याने धारदार शस्त्राने एकाची हत्या केल्याचे घटना समोर आली आहे.
मुंबईच्या वांद्रे परिसरात दर्ग्याच्या मालकीच्या जागेचा हक्क वरून 46 वर्षीय व्यक्तीची चौघांनी धारदार शस्त्राने निर्घण हत्या केली आहे. गुरुवारी सायंकाळी शाकीर अली शेख या व्यक्तीची चार जणांनी धारदार शस्त्र भोसकून हत्या केली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चार आरोपींना हत्याप्रकरणी अटक केली आहे. इमरान नासिर शेख, उस्मान अली झाकीर अली शेख, जाकिर अली शेख, फातिमा उर्फ कायनात इमरान खान असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचे नावे आहे. चारही आरोपींच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हात्याचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…