मुंबई

Bandra Fire News : वांद्र्यात भीषण दुर्घटना: नमाज कमिटीजवळील चाळ कोसळली; सात जखमी, अनेक अडकल्याची भीती

Bandra Latest Fire News : भारत नगरमधील तीन मजली चाळ कोसळली; सकाळच्या गोंधळात जीवघेणा हादरा

मुंबई | वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरात शुक्रवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. नमाज कमिटी मशिदीजवळील तीन मजली चाळ क्रमांक 37 अचानकपणे कोसळली. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, सात जण जखमी झाले आहेत, तर 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, आणि महापालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान सध्या युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत.

घटना घडलेला भाग अतिशय गर्दीचा आणि अरुंद रस्त्यांचा असल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. अग्निशमन दलाने सकाळी 6.19 वाजता वर्दी क्रमांक 1 तर 6.55 वाजता वर्दी क्रमांक 2 घोषित केली. याचा अर्थ, परिस्थिती गंभीर आणि नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे.

जखमींना तातडीने वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, जखमींची संख्या वाढू शकते, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा श्वास रोखला जाऊ नये यासाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि थर्मल सेन्सरचा वापर करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0