Balasaheb Thackeray Jayanti : बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांची जयंती
•शिवसेना पक्षाचे संस्थापक, सामना वृत्तपत्राचे संपादक, मार्मिक साप्ताहिक संपादक
मुंबई :- बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे जानेवारी 23 जानेवारी जयंती. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी नेता, व मराठी लोकांचे समर्थक होते. ‘सामना’ या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे ते संपादक होते.
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1947 रोजी झाला. सुरुवातीला त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र काही काळाने त्यांनी नोकरी सोडून मार्मिक हे साप्ताहिक सुरु केले. या साप्ताहिकातून त्यांनी मुंबईमधील परप्रांतियांच्या वाढत्या आक्रमणावर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली. याच प्रेरणेतून त्यांनी 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना हा पक्ष नसून शिवाजी महाराजांची सेना आहे अशी गर्जना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी चार दशके मुंबईसह देशाच्या राजकारणावर हुकूमत गाजवली.
मार्मिकचा उदय
बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, 1960 मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. 1960 पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या “श्याम” या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.
सामना वृत्तपत्र
वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक – वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळ ठाकरे यांचे अग्रलेख असे.