Balasaheb Thackeray Jayanti 2026 : मराठी अस्मितेचा हुंकार आणि हिंदुत्वाचा देदीप्यमान सूर्य; एका महायुगाचा कृतज्ञ गौरव
मुंबई | सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा शिवसेनेचा डरकाळीचा आवाज आणि मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे अढळ नेतृत्व म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आज त्यांच्या जन्माला 100 वर्षे पूर्ण होत असताना, काळाच्या पटलावर उमटलेली त्यांची पावले अधिकच गडद आणि प्रेरणादायी वाटत आहेत. हा केवळ एका नेत्याचा जन्मशताब्दी सोहळा नाही, तर स्वाभिमानाचा, अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा आणि धगधगत्या हिंदुत्वाचा उत्सव आहे.
अन्यायाविरुद्ध उगारलेली ‘कुंचल्याची’ तलवार
बाळासाहेबांच्या प्रवासाची सुरुवात एका व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून झाली. पण तो कुंचला केवळ रेषा ओढत नव्हता, तर समाजातील विसंगतीवर प्रहार करत होता. ‘मार्मिक’च्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडली. “मुंबई महाराष्ट्राची, पण मराठी माणूस कुठे?” हा त्यांनी दिलेला टाहो म्हणजे एका नव्या क्रांतीची ठिणगी होती. 19 जून 1966 रोजी ‘शिवसेना’ नावाच्या एका वटवृक्षाची लागवड झाली, ज्याने पुढे कित्येक पिढ्यांना सावली आणि लढण्याचे बळ दिले.
मराठी कणा आणि ‘हिंदुहृदयसम्राट’ पदवी
बाळासाहेबांनी मराठी माणसाला ‘ताठ कणा’ दिला. “मराठी आहे म्हणून काय झाले?” या न्यूनगंडातून बाहेर काढून “मी मराठी आहे याचा मला अभिमान आहे,” असे बोलायला त्यांनी शिकवले. 80 च्या दशकात त्यांनी हिंदुत्वाचा भगवा हाती घेतला. “गर्व से कहो हम हिंदू है” ही केवळ घोषणा नव्हती, तर विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र गुंफणारे ते सूत्र होते. देशाच्या राजकारणात जेव्हा हिंदुत्वाचा शब्द उच्चारण्याची कोणाची हिंमत नव्हती, तेव्हा बाळासाहेबांनी उजळमाथ्याने धर्माचा आणि संस्कृतीचा पुरस्कार केला. म्हणूनच जनतेने त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी बहाल केली.
शताब्दीचे स्मरण आणि भविष्याचा मार्ग
आज महाराष्ट्र आणि देश बदलला आहे, पण बाळासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता आजही कमी झालेली नाही. प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा समतोल कसा साधावा, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करताना, त्यांनी दिलेला ’80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ हा मंत्र पुन्हा एकदा अंगीकारण्याची गरज आहे.
मैदानावरचा जादूगार: शब्दांचा अंगार
शिवाजी पार्कचा तो अथांग जनसागर आणि व्यासपीठावरचा तो ढाण्या वाघ! “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” या एका वाक्याने अंगावर रोमांच उभे राहत. त्यांचे भाषण म्हणजे विचारांचे सोने असायचे. साधी, सरळ पण थेट काळजाला भिडणारी भाषा ही त्यांची शक्ती होती. समोरच्या शत्रूचे वस्त्रहरण करतानाही त्यांचा विनोद आणि उपरोध तितकाच धारदार असे.
•पोयसरमधील घरफोडी प्रकरणी मुख्य आरोपी गजाआड; छताचा पत्रा उचकटून केला होता डल्ला; सर्व मुद्देमाल जप्त…
Thackeray Members On Kishori Pednekar : माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्षांना डावलल्याची चर्चा; 65 नगरसेवक…
•रायपूरमध्ये विक्रमी पाठलाग; सूर्याचे 467 दिवसांनंतर अर्धशतक, तर इशानची न्यूझीलंडविरुद्ध सर्वात वेगवान फिफ्टी; 5 सामन्यांच्या…
Uddhav Thackeray On BJP Member : ठाकरे बंधूंच्या व्यासपीठावरून फुंकले लढाईचे रणशिंग; "गद्दारांची जागा निष्ठावंत…
Kandivali SamtaNagar Police Latest News : पोयसरमधील घरफोडी प्रकरणी मुख्य आरोपी गजाआड; छताचा पत्रा उचकटून…
•ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर; राज यांच्या 'फॅमिली डॉक्टर'च्या किस्स्याने सभागृहात हास्यकल्लोळ; शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या…