खासदार ऑपरेटरला उत्तर देत नाही अशी बोचरी टीका बजरंग आप्पा सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर केली आहे
बीड :- लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अवघ्या सहा हजार मतांनी पाडून विजय मिळवणाऱ्या मराठवाड्यातील जॉईंट किलर ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार नवनिर्वाचित खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांना कॉल केल्याचा दावा केला होता. त्यावर आता बजरंग सोनवणे यांच्याकडून अमोल मिटकरी यांच्यावर सणसणीत टीका करण्यात आली आहे.
मला पदरात घ्या असा फोन बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांना केल्याचा दावा मिटकरी यांनी केला होता. त्यावर सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांचा चांगला समाचार घेतला आहे अमोल मिटकरी हे दादांच्या बंगल्यावरचे काय ऑपरेटर आहे का? कोण आहेत अमोल मिटकरी? असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. कारण ऑपरेटरकडेच फोनचे रेकॉर्ड असतात असा टोलाही त्यांनी लावला आहे.
वडील कानाखाली मारतील, बायको जेवण देणार नाही
मी कोणत्याही प्रकारे अजित पवार यांना कॉल केला नसून अमोल मिटकरी यांचा दावा खोटा असल्याचे भजन सोनवणे म्हणाले आहे.माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने खूप प्रेम केले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडेल. पवार साहेबांना सोडायचं म्हंटल्यावर माझे वडील मला कानसुलित मरतील.माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विधानसभेत आमच्या 200 च्या वर जागा लागतील. आकडा सांगणे हे आमचा धंदा नाही.आमचं सरकार येणार म्हणजे येणार हे मी जबाबदारीने सांगतो. पक्ष जो माझ्यावर मराठवाड्यातील विधानसभेची जबाबदारी देईल तेवढं मी पार पाडेन. ऑपरेटरला उत्तर देणे हे खासदार म्हणून माझे काम नाही, असा टोला पण त्यांनी मिटकरी यांना हाणला.ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे हे अमोल मिटकरी यांनी सांगावं, असे सोनावणे यांनी आवाहन केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…