•बागपतमध्ये भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मानस्तंभ संकुलात लाकडी मचाण कोसळला. त्यामुळे 50 हून अधिक भाविक गाडले गेले. 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. पोलिस-प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी आहेत. बचावकार्य सुरू आहे.
ANI :- उत्तर प्रदेशातील बागपतमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे मंगळवारी सकाळी भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवादरम्यान मानस्तंभ संकुलातील लाकडी मचाण कोसळला. त्यामुळे 50 हून अधिक भाविक गाडले गेले. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी लगेचच चेंगराचेंगरी झाली.याशिवाय चेंगराचेंगरीवर नियंत्रण ठेवणारे 5 पोलीसही जखमी झाले आहेत.
बरौत शहरातील कोतवाली परिसरातील गांधी रोडवर हा भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. डीएम अस्मिता लाल आणि एसपी अर्पित विजयवर्गीय हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींची माहिती घेत आहेत.
श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या मैदानावर बांधण्यात आलेल्या मानस्तंभाचे व्यासपीठ कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज येथे निर्वाण महोत्सवाअंतर्गत धार्मिक कार्यक्रम होणार होता, याठिकाणी 65 फूट उंच स्टेज बांधण्यात आला.त्याच्या पायऱ्या तुटल्या. त्यामुळे तेथे बांधलेला प्लॅटफॉर्म कोसळून अनेक भाविक त्याखाली गाडले गेले. त्यानंतर तेथे चेंगराचेंगरी झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बागपत जिल्ह्यातील घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…