क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

बदलापूर : सोनसाखळी चोरणा-या सराईत चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Badlapur Chain Snatching Case : प्रवीण प्रभाकर पाटील असं आरोपीच नाव असून, त्याच्यावर बदलापूर पश्चिम आणि पूर्वे येथे 5 सोनसाखळीचे गुन्हे दाखल आहेत.

बदलापूर :- पायी जाणा-या महिलांच्या गळ्यातील मंगळसुञ, सोनसाखळी चोरणा-या सराईत चोराला बदलापूर पूर्व पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे. Badlapur Chain Snatching Case त्याच्याकडून सोन्याच्या साखळी आणि मंगळसुञ सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केल्या आहेत. Badlapur Police Station जवळपास 2 लाख 27 हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.

28 नोव्हेंबरला रात्रीच्या दरम्यान राजश्री विजय गोरड (40 वय रा. बदलापूर पूर्व) कामावरून पाय घरी जात असताना मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना थाप मारून त्यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचा एक तोळ्याचे मंगळसूत्र जबरदस्ती खेचून नेले. त्याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश गज्जल आणि त्यांच्या तपास पथकाने बदलापूर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील घटनास्थळी आणि आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून पोलिसांना एक संशयित आरोपी महिलांना येता जाताना निगराणी करत असताना आढळून आला. पोलिसांनी आरोपीचा तपास घेऊन गांधी चौक बदलापूर पूर्व येथे मोठ्या सीताफिने ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून डिस्कवर मोटरसायकल ताब्यात घेऊन आरोपी प्रवीण पाटील यांची सखोल चौकशी केली असता गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपीचे सखोल चौकशी करून आरोपीने बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरात अशाच प्रकारे सोनसाखळी करून पाच गुन्हे केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून 45 ग्रॅम वजनाचे एकूण दोन लाख 27 हजार रुपये किमतीचा सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर, सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ, शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश गज्जल, पोलीस उप निरीक्षक गोविंद चव्हाण, पोलीस उप निरीक्षक, प्रशांत थिटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम कुकले, पोलीस हवालदार विजय गिरीगोसावी, जगदिश म्हसकर, सुधाकर वरखंडे, कृष्णा पाटोळे, विष्णु मिरकले, कुणाल शिर्के, पोलीस नाईक विनोंद नेमाणे, पोलीस शिपाई महादेव पिसे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0