Badlapur Tadipar News : तडीपार आरोपीला केले अटक, मनाई आदेश असतानाही शहरांमध्ये वावर
•आरोपीला दोन वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून केले होते हद्दपार
बदलापूर :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हिललाईन पोलीस ठाणे अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. हिललाईन पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला बदलापूरमधून अटक केली आहे.
आरोपी शांताराम मालुसरे, (25 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांनी ठाणे, जिल्ह्याच्या हद्दीतुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 27 डिसेंबर 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 12 एप्रिल रोजी रात्री 09.55 वा. चे सुमारास, गोपी गार्डन बदलापूर पूर्व येथे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या पथकास मिळुन आला आहे. पोलिसांना आरोपीकडे एक कोयता सापडला आहे.
प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 प्रमाणे, भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी शांताराम मालुसरे, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.